लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा हल्ला, आदेश द्या, ‘पीओके’वर तिरंगा फडकवू!

572

संपूर्ण जम्मू-काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, असा संसदेचा ठराव आहे. संसदेची इच्छा असेल आणि केंद्र सरकारने तसा आदेश दिला तर पाकव्याप्त कश्मीरवर (पीओके) कब्जा मिळवू. पीओके हिंदुस्थानच्या ताब्यात असेल, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वीच लष्करप्रमुख नरवणे यांनी सीयाचीनला भेट दिली होती. ‘आर्मी डे’च्या पार्श्वभूमीवर शनिवारी लष्करप्रमुख मनोज नरवणे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला.

काय म्हणाले लष्करप्रमुख

  • देशांच्या सीमांचे, सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर आहे. पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यात हिंदुस्थानला यश येत आहे.
  • सियाचीन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थानचे लष्कर पूर्णपणे सक्षम आहे.
  • संपूर्ण जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव आपल्या संसदेने खूप वर्षांपूर्वीच मंजूर केला आहे. संसदेची इच्छा असेल आणि केंद्र सरकारने त्यासंबंधीचे आदेश दिल्यास पाकव्याप्त कश्मीरवर कब्जा करू. पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊ.

स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचे ‘विक्रमादित्य’वर यशस्वी अरेस्टेड लँडिंग

स्वदेशी बनाकटीच्या लढाऊ तेजस विमानाने आज प्रथमच हिंदुस्थानी नौदलाच्या विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य नौकेवर यशस्वीरीत्या अरेस्टेड लँडिंग केली. कमांडर जयदीप मावळंकरने ही यशस्वी लँडिंग केल्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱयांनी दिली. मुंबईच्या समुद्रात आयएनएस विक्रमादित्य ही नौका उभी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या