
खेड नगर परिषदेने शासनाच्या निर्देशान्वये विशेष वसुली अभियान राबवण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मालमत्ता कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तसेच पाणीपट्टी कर थकबाकीदारांचे।नळ कनेक्शन तोडण्याची मोहीमही हाती घेतली आहे.
खेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील, वसुली लिपिक गंगाधर गायकवाड, उमेश रेपाळ व पथकाकडून ही मोहीम तीव्र करण्यात आली. या पथकाकडून कर वसुली करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर त्वरित नगर परिषद कार्यालयात भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


























































