दारू प्यायलेल्या दोन कर्मचार्‍यांवर पोलीस कारवाई

1788

निवडणूक कर्तव्य बजावताना दारू पिऊन आलेल्या बुलढाणा तालुक्यातील दोन कर्मचार्‍यावर पोलिसांनी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली आहे.

मेहकर विधानसभा मतदार संघातील मतदान घेण्यासाठी रविआरी येथील वखार महामंडळ येथे कर्मचारी जमा झाले असता शिवाजी पांडुरंग शेळके व राजेंद्र प्रल्हादसिंग मेहेर हे बुलढाणा तालुक्यातील कर्मचारी मद्यपान प्राशन करू गोंधळ करीत असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी गणेश राठोड यांनी पोलीस निरीक्षक मेहकर यांना दिले. त्यानुसार मेहकर पोलिसांनी या दोन कर्मचार्‍यांची ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करून अहवाल मागितला. वैद्यकीय अहवालानुसार त्यांचेवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. तर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या