कोरोनासारख्या आपत्तीत गैरहजर राहिल्याने परळी तालुक्यातील दोन तलाठ्यांचे निलंबन

1508

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दोन तलाठ्यांवर प्रशासनाकडून निलंबननाचा बडगा उगारण्यात आला आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीचे आदेश असताना गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती असताना त्याचे गांभीर्य आणि जबाबदारीचे भान नसल्याने शुक्रवारी परळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी दोन तलाठ्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

तालुक्यातील नागपिंप्रीचे तलाठी मोतिराम गुंडेराव जिलेवाड तर पिंपळगाव गाढेचे तलाठी सचिन सुधीर एंरडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघावंर कामात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना आणि कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात कोरोना सारखी नैसर्गिक आपत्ती असताना हे तलाठी गैरहजर होते.

आपली प्रतिक्रिया द्या