सीबीआय पोलीस असल्याची बतावणी; महिलांना डिजिटल अटक करणाऱ्यांना दणका

मुंबई, दिल्ली पोलीस तसेच सीबीआयमधून पोलीस अधिकारी बोलतोय, आमच्याकडे दाखल गुह्यात तुमचा सहभाग आहे, अशी भीती दाखवत महिलांना डिजिटल अटक करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर भामटय़ांना मुंबई सायबर पोलिसांनी दणका दिला. त्यांनी एका महिलेला डिजिटल अटक करून एक कोटी 26 लाख रुपयांचा गंडा घातला होता. परंतु सायबर पोलिसांनी वेळीच कारवाई करत एक कोटी 23 लाख रुपयांची रक्कम गोठविली. तसेच सायबर गुन्हेगारांना बँक खाती पुरविणाऱ्या रोहित सोनार (33) आणि हितेश पाटील (31) अशा दोघांना अटक करण्यात आली.