जुगाराच्या अड्डय़ावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर येथील जुगाराच्या अड्डय़ावर क्राइम ब्रँच युनिट-7 ने कारवाई केली. जुगार खेळणाऱ्या 17 जणांना अटक करून पुढील कारवाईसाठी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

घाटकोपर पूर्व परिसरात एका ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती युनिट-7 ला मिळाली. त्या माहितीनंतर शनिवारी सायंकाळी युनिट-7 च्या पथकाने जवाहर रोड येथे कारवाई केली. तेव्हा 17 जण जुगार खेळताना आढळून आले. घटनास्थळाहून पोलिसांनी 1 लाख 66 हजार रुपये हस्तगत केले आहेत. जुगाराचा क्लब चालवणारा मालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्या 17 जणांविरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.