विनापरवाना वाळू व चिरे वाहतूकप्रकरणी कारवाई; दोन डंपर मालकांना 2 लाख 77 हजाराचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिबाव येथे विनापरवाना वाळू वाहतूक व आचरापारवाडीजवळ मशवी येते विनापरवाना चिरे वाहतूक केल्याप्रकरणी दोन डंपर चालक-मालकांना देवगड तहसीलदार यांनी 2 लाख 77 हजाराचा दंड ठोठावला आहे. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दहीबाव येथे प्रविण खोत (मसुरे मालवण )यांच्या मालकीचा डंपर दोन ब्रास विनापरवाना वाहतूक करत असताना देवगड महसूल विभागाने पकडला.

देवगड तहसीलदारांनी याप्रकरणी डंपर चालक मालकांना 1 लाख 60 हजार 832 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आचरा मशवी येथे विनापरवाना 1 ब्रास चिरे वाहतूक करताना अजय साटम (आचरा चिदर )यांच्या मालकीचा ट्रक पकडून देवगड तहसील कार्यालय येथे आणला. देवगड तहसीलदारांनी त्यांना 1 लाख 16 हजार 750 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी देवगड सुधीर पाटील, वाघोटन तलाठी प्रमोद कोळपकर ,मंडळ निरीक्षक सरोदे या पथकाने केली आहे.