
बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याला अखेर हिंदुस्थानी नागरिकत्व पुन्हा एकदा बहाल करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी एक्स (ट्विट)वर अक्षयने आपल्या चाहत्यांसाठी ही माहिती शेअर केली आहे. आता मन आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्थानी झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… जय हिंद. असे ट्विट करीत अक्षयने आनंद व्यक्त केला आहे.























































