मुलाचा स्ट्रगल पाहून ‘बाप’माणसाला व्हायच्या वेदना, बॉबी देओलने सांगितली धर्मेंद्र यांच्या मनातील घालमेल

देओल कुटुंबाच्या घरात सध्या आनंदाचे वातारण असून हे वर्ष त्यांच्यासाठी खास ठरले आहे. सनी देओलचा ‘गदर 2’ आणि बॉबी देओलचा ‘अॅनिमल’ आणि धर्मेंद्रचा ‘रॉकी ओर रानी’ हे सिनेमे हीट ठरले आहेत. मात्र तत्पूर्वी देओल कुटुंबाने पडता काळही पाहिला. मात्र या कठीण काळात संपूर्ण देओल कुटुंब एकमेकांची ताकद बनून उभे होते. अशातच बॉबी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतील वडील धर्मेंद्र यांनी स्ट्रगल काळात कशी साथ दिली याची आठवण सांगितली आहे.

बॉबी देओलचा ‘अॅनिमल’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे. या सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाबरोबरच बॉबी देओलच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कठीण काळातील आठवणींना उजाळा दिला.

तो म्हणाला, माझ्या वडिलांनी माझा पडता काळ जवळून पाहिला आहे. त्यांना माझी कुवत माहिती होती. मी काय करु शकतो हे त्यांना माहिती होते. त्यांनी कायम मला साथ दिली. आता तर ते मला सांगतात, तू काहीही करु शकतोस. कोणत्याही वडिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट असते.

बॉबी देओल पुढे म्हणाला, कठीण काळात मी वडिलांसोबत काही शेअर करु शकत नव्हतो. पण ते मला ओळखत होते. माझ्या वेदना त्यांना जाणवत होत्या आणि मला तसे पाहून तेही निराश व्हायचे. कदाचित त्यावेळी ते सांगू इच्छित होते की, तुझ्यावर विश्वास ठेव. मात्र हे माझ्याशी बोलणं त्यांच्यासाठी सोपे नव्हते.

बॉबी देओलबद्दल बोलायचे तर त्याचा ‘अॅनिमल’ सिनेमा बॉ़क्स ऑफीसवर हिट ठरतोय. सिनेमात बॉबी देओलच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. तसेच त्याच्या आश्रम या वेबसीरिजचेही कौतुक झाले.