अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा

बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे आजोबा झाला आहे. अनन्या पांडेची चुलत बहीण आणि चंकी पांडेची पुतणी अलाना पांडे हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अलाना पांडे ही मागील वर्षी मार्च महिन्यात इव्हर मॅव्रेसोबत विवाहबद्ध झाली होती. अलाना आणि इव्हर यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर करत मुलगा झाला असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये अलाना, इव्हर आणि नवजात बाळही दिसत आहे.