
दिल्लीत लाल किल्ल्यावर 26 जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण त्यानंतर दिल्ली पोलिसांनी पुरातत्व विभागाच्या (एएसआय) तक्रारीची दखल घेत दीप सिद्धूला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दीपच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पुरातन वास्तूची तोडपह्ड करणाऱया जमावाला चिथावणी दिल्याचे आरोप सिद्धूवर ठेवण्यात आले आहेत.






























































