
सामना ऑनलाईन । मथुरा
हेमा मालिनी यांना भाजपने मथुरेतून पुन्हा उमेदवारी दिली आहे. निवडणुकीसाठी हेमा मालिनी यांनी प्रचाराला वेग दिला आहे. त्यांच्या प्रचारासाठी अभिनेते धमेंद्रही मैदानात उतरले असून रविवारी त्यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहेत. आपण शेतकरी असल्याचे सांगत त्यांनी जनतेला हेमा मालिनी यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. हेमा मालिनी यांनी मताधिक्याने मतदान केले नाही तर तुमच्या गावतील टाकीवर मी चढीन, असे सांगत गाववाल्यांनो हेमा मालिनी यांना मताधिक्याने विजयी करा, असे शोलेतील फिल्मी स्टाईलने त्यांनी जनतेला आवाहनही त्यांनी केले.
मी तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे. माझे वडिल शेतकरी होते आणि शाळेत शिक्षकही होते. लहानपणी माझी आई माझ्या हातात तिंरगा देत होती. त्यानंतर इन्कलाब जिंदाबादचे नारे देत मी गावातून फिरत असे. माझे वडिल आईला म्हणाले, ही गोष्ट ब्रिटिशांना समजली तर माझी शिक्षकाची नोकरी जाईल. आई त्यांना म्हणाली तुमची नोकरी गेली तर जाऊ द्या, मात्र, मी माझ्या मुलाला देशभक्त बनवणार. हा आपल्या बालपणीचा किस्सा सांगत देशभक्तीचे बाळकडू आपल्याला चौथ्या वर्षांपासूनच मिळाल्याचे धमेंद्र यांनी सांगितले. आज प्रत्येकाने देशभक्ती दाखवण्याची गरज आहे. तुम्ही एकजूट दाखवली तर कोणीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याआधी धमेद्र यांनी ऑडिओ क्लिप जारी करून मथुरेतील जनतेला हेमा मालिनी यांनी मतदान करण्याचे आवाहन केले होते. प्रचारसभेत येण्यापूर्वी हेमा मालिनी यांनी ट्विटरवरून एक फोटोही शेअर केला. त्यात त्या धमेंद्र यांच्यासोबत दिसत आहेत. आज माझ्यासाठी संस्मरणीय दिवस असून धमेंद्रजी माझ्या प्रचरासाठी मथुरेत आले आहेत, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Today is also a special day for me! Dharamji is here in Mathura to campaign for a whole day on my behalf. The public is waiting eagerly to get a glimpse of him & listen to what he has to say! A photo taken in my house in Mathura just now before we leave for campaigning… pic.twitter.com/JBhklXDp0v
— Hema Malini (@dreamgirlhema) April 14, 2019
या निवडणुकीत हेमा मालिनी यांच्यासमोर सपा-बसपा आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे आव्हान आहे. त्यामुळे हेमा मालिनी यांनी प्रचरासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. याआधी त्यांनी मथुरेतील शेतात जाऊन गव्हाचे पीक कापतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. आपण मथुरेतील जनतेसाठी चांगले काम केले असून जनता आपल्या पाठिशी उभी राहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

























































