जुहीच्या बागेत आंब्यांचा ढीग

अभिनेत्री जुही चाकला सध्या सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. ती नवनवीन फोटो आणि व्हिडियो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या जुही तिच्या वाडा येथील फार्महाऊसवर आहे. तिथले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. त्यातील एका फोटोत जुहीच्या समोर गोड, रसाळ आंब्यांचा ढीग परसलेला दिसतोय. दुसऱया एका फोटोत जुही टेबलावर बसून काही लोकांशी चर्चा करताना दिसतेय. या फोटोला कॅप्शन देताना जुहीने लिहिलंय, ‘‘काडा फार्मवरचं हे माझं नवीन ऑफिस. हकेशीर आणि ऑक्सिजनने परिपूर्ण असं. इथे गायींसाठी गोठा, स्टाफ क्कार्टर आणि जास्त फळं देणाऱया झाडांच्या लागकडीची योजना आखतोय.’’

जुही मागील काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी निसर्गाच्या जास्त जवळ आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून तिचे पर्यावरण प्रेम झळकत असतं.

आपली प्रतिक्रिया द्या