तेव्हा भाटकर म्हणाले होते, शरीर साथ देईल तोपर्यंत काम करायचंय

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी 98 व्या नाट्य संमेलनामध्ये अभिनेते रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. यावेळी भावूक झालेल्या भाटकर यांनी जोपर्यंत माझे शरीर साथ देईल तोपर्यंत मला काम करायचे आहे असे म्हटले होते.

जीवनगौरव पुरस्कारानंतर अभिनेते रमेश भाटकर खूपच भावूक झाले होते. ‘हा पुरस्कार मला कोणत्याही भूमिकेसाठी मिळालेला नाही. माझ्या आतापर्यंतच्या एकूण बऱ्या-वाईट कारकीर्दीची दखल घेऊन माझ्या मातृसंस्थेने दिलेल्या या पुरस्काराचे मला जास्त महत्त्व वाटते, असेही ते म्हणाले होते. तसेच जीवनगौरव मिळाला म्हणजे मी निवृत्ती घेतली असे नाही तर जोपर्यंत माझे शरीर साथ देईल तोपर्यंत मी काम करतच राहणार आहे’, असेही ते म्हणाले होते.

ramesh-bhatkar-1

आपली प्रतिक्रिया द्या