महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता समीर चौगुले याचा आज वाढदिवस आहे. त्याला मराठी दिग्दर्शक विजू माने आणि अभिनेता कुशल बद्रिके याने आगळ्यावेगळ्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत.
विजू माने याने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत समीर चौगुलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत कुशल बद्रिकेही दिसत असून तो समीर चौगुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात केलेल्या वेगवगेळ्या पात्रांची नक्कल करत त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे.
या व्हिडीओवर रिप्लाय करत समीर चौगुले याने लिहिलं आहे की, ‘रे तुम्ही वेडे आहात का? वाढदिवसाच्या इतक्या सुंदर शुभेच्छा मला आजवर मिळाल्या नव्हत्या….तुम्हाला खूप खूप खूप कायच्या काय प्रेम रे.’



























































