प्रसिद्ध अभिनेत्याला चाहतीकडून मनस्ताप, दिवसाला येतात साडे तीनशे मेसेज

1625

चाहत्यांचं प्रेम कोणत्या कलाकाराला नको असतं. प्रत्येक कलाकार त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ याला सध्या एका विचित्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एक चाहती त्याला सतत मसेज करून त्रास देत असल्याचे समोर आले आहे.

संग्रामने स्वत: फेसबुकवरून व्हिडीओ लाईव्ह करून याबाबत माहिती दिली आहे. संग्राम याला त्रास देणाऱ्या तरुणीचे नाव स्वीटी सातारकर असून ती त्याला वेगवेगळ्या क्रमांकावरून दिवसाला तीनशे ते साडे तीनशे मेसेज करत असल्याचा दावा संग्रामने केले आहे. ‘मी त्या तरुणीच्या वागण्याने हैराण झालो आहे. तिला सर्वोतपरी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे मेसेज सुरूच असून आता मी तिच्यापुढे हतबल झालो आहे. तिच्यामुळे खासगी आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होत आहेत. अशा प्रकारचे वागणे योग्य नाही. तिचे पालक किंवा तिच्या परिचयात असलेल्या व्यक्तीने तिला समजावण्याचा प्रयत्न करावा’, अशी विनंतीच संग्रामने या व्हिडीओतून केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या