अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगाने निधन

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये भुमिका साकारणारे अभिनेते व स्क्रिप्ट रायटर शफीक अन्सारी यांचे कर्करोगाने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. गेल्या रविवारी 10 मे रोजी त्यांचे निधन झाले. शफिक यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, माधुरी दीक्षित, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम केले आहे.

शफीक अन्सारी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र क्राईम पेट्रोलमधील त्यांची पोलिसाची भुमिका अनेकांच्या स्मरणात राहिली. शफीर अन्सारी यांना जठराचा कर्करोग झाला होता. व गेल्या अनेक वर्षांपासून ते या आजाराशी लढा देत होते. मात्र सहा महिन्यापूर्वी त्यांना फुफ्फुस्सात इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. टिव्ही आर्टिस्ट असोशिएशन सिंटाने त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या