शाहिद कपूरने खरेदी केला लग्झरी फ्लॅट

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईतील वरळी भागातील ओबेरॉय 360 वेस्ट प्रकल्पात जवळपास 59 कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा लग्झरी फ्लॅट 5,395 चौरस फूट रेरा कार्पेट क्षेत्रफळ इतका मोठा आहे. त्यात पार्ंकगच्या तीन जागासुद्धा देण्यात आल्या आहेत. 24 मे 2024 रोजी 58.66 कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार नोंदविला गेला आहे, असे कागदपत्रांवरून दिसून आले आहे.