Photo: गोल्डन ड्रेसमध्ये आलिया भट्ट दिसतेय कमालीची सुंदर, फोटो पाहून व्हाल अवाक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच तिच्या क्युट लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर सौदी अरेबियातील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया भट्ट तिच्या चमकदार गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये ड्रेसमध्ये दिसत आहे. आलियाने चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच हलका मेकअप केला असून लाईट रंगाच्या लिप शेडसह आलियाने साइड पार्टीशन देऊन तिचे केस वेव्ही मोकळे ठेवले आहेत. आलिया भट्टचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आलिया भट्टने तिच्या या फोटोंसोबत फोटो ओळही दिली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले- Smile. Sparkle. Saudi.. आलिया भट्टच्या नवीन फोटोंवर नेटिझन्स भरभरून कमेंट करत आहेत. काहीजण अभिनेत्रीला ब्युटी क्वीन म्हणत आहेत तर काहीजण तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक करत आहेत.