Photo – शिमरी साडीत बॅकलेस ब्लाऊजमध्ये दीपिका पादुकोण, अदा पाहून व्हाल फिदा

बॉ़लीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने बाफ्ता फिल्म अॅवॉर्ड्सना रिप्रेझेंट करण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. दीपिकाने बाफ्टा अॅवॉर्ड़ सोहळ्यासाठी ऑल ऑफ व्हाईट लूक केले होते. या सोहळ्यासाठी तिने खास साडी नेसली होती. लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये आज बाफ्टा फिल्म अॅवॉर्ड सोहळा होणार असून त्याला रिप्रेझेंट करणाऱ्यांपैकी एक नाव दीपिका पादुकोणचेही आहे.इव्हेण्टला जाण्यापूर्वी दीपिकाने तिचे बाफ्टासाठी केलेले लूक इंस्टाग्रामवर शेअर केले. यात दीपिकाने ऑफ व्हाइट रंगाची शिमरी साडी नेसली असून त्यावर तिने मॅचिंग बॅकलेस ब्लाऊज घातला आहे. ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसत असून लूक पूर्ण करण्यासाठी मॅचिंग इअररिंग्स आणि हेअर बन करुन पूर्ण केले आहे, सोबत मेकअप मिनीमल ठेवले आहे.