दीपिकाच्या गाऊनची 34 हजाराला विक्री

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या पिवळ्या मॅटर्निटी गाऊनचा लिलाव झाला. दीपिकाचा हा स्पेशल गाऊन 34 हजार रुपयांना विकला गेला. ही माहिती दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली. दीपिका सध्या प्रेगन्सीमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने एका ब्रँडचे प्रमोशन केले. त्या वेळी तिने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला. त्या वेळी बेबी बंप आणि तिच्या प्रेग्नन्सी ग्लोने लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 72 तासांत तिच्या या गाऊनचा लिलाव झाला. ‘फ्रेश ऑफ द रॅक’ उपक्रमाचा भाग म्हणून गाऊन लिलावासाठी ठेवण्यात आला. या विक्रीतून येणारी रक्कम दीपिका दान करणार आहे. दीपिका आणि रणवीर सिंह यांनी फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या घरी  छोटय़ा पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिलेली आहे. दीपिकाचा अजय देवगनसोबतचा ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.