Divyanka Tripathi – दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, हाताची दोन हाडं तुटली

टीव्ही इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या चाहत्यांसाठी बातमी आहे. दिव्यांकाचा गुरूवारी रात्री अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या हाताची दोन हाडे तुटली आहेत. ही बातमी दिव्यांकाचा पती विवेक दहियाने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soapbox (@soapboxprelations)

 

विवेक दहियाच्या सोपबॉक्स पीआर टीमने इंस्टाग्राम अकाऊंटवर दिव्यांकाच्या हेल्थ विषयी माहिती दिली. त्यानंतर विवेकचे लाईव्ह सेशन रद्द करण्यात आले आहे. काही तासांपूर्वी दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला होता आता ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. आणि विवेक त्यांच्यासोबतच आहे.या अपघातात दिव्यांका त्रिपाठीची हाताची दोन हाडे तुटली आहेत. आता त्यावर शस्त्रक्रिय.ा करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर दिव्यांकाचे चाहते काळजीत पडले असून लवकर बरी हो अशा प्रार्थना करत कमेंट केल्या आहेत. ये है मोहब्बते या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली दिव्यांका आजही सर्वांच्या मनात घर करुन आहे.