ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन

1191

गरम हवा, शोले, राम तेरी गंगा मैली अशा चित्रपटात काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ए.एस साथ्यू यांच्या ‘गरम हवा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. प्रसिद्ध निवेदक निर्माते सिद्धार्थ काक यांच्या त्या पत्नी होत.


View this post on Instagram

Trishul May 5, 1978. Rishi Kapoor was offered Sachin’s role in Trishul but he refused the offer. The decline shocked Salim Khan and Javed Akhtar, who told him that refusing the role would, ruin his career because they were a big name in the film industry and the role had been tailored made for him! Even though he declined the role he still showed up to the first shot of the film; maybe to cheer on uncle, Shashi? – Rishi mentioned in his autobiography. . . Seen here at the mahurat shot of the film Trishul are Yash Chopra, Randhir Kapoor, Shashi Kapoor, Poonam Dhillon, Amitabh Bachchan, Gita Siddharth, Sanjeev Kumar and Rishi Kapoor on January 3, 1977. @amitabhbachchan @chintskap @poonam_dhillon_ @yrf #trishul #yashchopra #yrf #amitabhbachan #sanjeevkumar #shashikapoor #sachin #waheedarehman #raakhee #rakheegulzar #hemamalini #poonamdhillon #premchopra #gitasiddharth #salimjaved #gulshanrai #bollywood #classicfilms #hindifilms #retrobollywoood #rishikapoor #102notout #mahuratshot

A post shared by @ retrobollywood on

गीता यांनी गुलजार यांच्या परिचय या चित्रपटातून जया बच्चन आणि जितेंद्र यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी शोले, त्रिशूल, डिस्को डान्सर, राम तेरी गंगा मैली, नूरी, देश प्रेमी, डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की, शौकीन, अर्थ, एक चादर मिली सी, गमन आणि दुसरा आदमी या चित्रपटांमधून गीता काक यांनी काम केले आहे. मात्र राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित गरम हवा या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची व त्यांच्या अमिना नावाच्या भूमिकेची वाहवाह झाली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या