‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये अभिनेत्री केतकी दवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी सब वाहिनीवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेतील ट्विस्ट्स आणि टर्न्स नेहमीच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतात. आता लवकरच या मालिकेत दिग्गज अभिनेत्री केतकी दवे सोनलची (भक्ती राठोड) सासू कुंजबालाच्या भूमिकेत प्रवेश करणार आहे. या सासू-सूनेमध्ये खडतर, पण विनोदी नाते आहे. कुंजबाला ही प्रबळ व नीडर वृद्ध महिला आहे, जी प्रत्येक गोष्टीवर ठाम राहते. ती कठोर, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक आहे. तिच्या कडक, तत्ववादी आणि खडतर स्वभावामुळे सोनलचं जीवन अवघड झाले आहे. सोनलच्या प्रत्येक कृतीवर तिच्या सासूची बारीक नजर आहे. आपल्या अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या केतकी दवे कुंजबालाच्या भूमिकेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

भूमिकेबाबत केतकी दवे म्हणाल्या, ‘‘ही भूमिका माझ्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. मालिकेच्या कलाकारांसोबत काम करताना खूप धमाल येत आहे. मला माझी आई सरिता जोशीसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, जी राधा काकूची भूमिका साकारत आहे. माझी भूमिका कुंजबाला ही खडतर व स्वावलंबी महिला आहे, जिची तत्त्वे काळासह अधिक दृढ झाली आहेत. प्रेक्षकांना कुंजबाला व सोनल यांच्यामधील संवाद पाहायला आवडेल.’’