आई होण्यास नकार दिल्याने अभिनेत्रीची मालिकेतून हकालपट्टी

113

सामना ऑनलाईन । मुंबई

मालिकेत आई होण्याची भूमिकेची गरज असताना ती नाकारल्यामुळे एका अभिनेत्रीची मालिकेतून हकालपट्टी झाली आहे. गेली तीन वर्षं ती या मालिकेत काम करत होती. मात्र, आता तिच्या जागी मालिकेत दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता आहे.

या अभिनेत्रीचं नाव मीरा देवस्थळे असं आहे. छोट्या पडद्यावरील उडान या मालिकेत तिने चकोर ही भूमिका साकारली होती. या मालिकेत आता एक ट्विस्ट आला असून मालिकेचा काळ पुढे गेलेला दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे कथेच्या मागणीनुसार मीराला 18 वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका करावी लागणार होती. त्या भूमिकेसाठी वय खूपच लहान असल्याचं मीराने मालिकेच्या निर्मात्यांना कळवलं होतं. मी फक्त 22 वर्षांची आहे. या वयात मी 18 वर्षांच्या मुलाची आई कशी साकारू शकते. मी तसा प्रयत्नही करून पाहिला. मात्र, माझं वय त्यात आड येत होतं. त्यामुळे माझ्या भूमिकेला मी न्याय देऊ शकणार नाही, याची जाणीव मला झाली, अशा शब्दात मीराने आपल्या भूमिकेबाबत सांगितलं.

meera-dev

मीराने आईची भूमिका करण्यास नकार दिल्याने मालिकेच्या निर्मात्यांनी तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता मीरा तिचं मूळ गाव बडोदा येथे जाणार असून मालिकेतून बाहेर पडल्याने आता स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्याकडे कल असल्याचं तिचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या