अभिनेत्रीला पाठवले सेक्स टॉय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी मालिकामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला अज्ञात व्यक्तीने सेक्स टॉय पाठवल्याची घटना समोर आली आहे. घडल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार या अभिनेत्री असून त्या अंधेरी परिसरात राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांना एका वेबसाइटच्या माध्यमातून कुरिअर येत आहे. त्या बॉक्समध्ये सेक्स टॉय होते. गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत सात ते आठ वेळा अभिनेत्रीला सेक्स टॉय आले आहे. या त्रासाला कंटाळून अखेर अभिनेत्रीने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीला कोणत्या वेबसाइटवरून ते कुरिअर आले होते, सेक्स टॉयस ज्या नंबरवरून बुक केले होते, त्या नंबरचा पोलीस शोध घेत आहेत.