रुपालीचं बदललेलं रूप पाहून चाहते अवाक!

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले ही छोटय़ा पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच रुपालीने एक कोलाज इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. त्यात तिचा चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचा आणि आताचा फोटो दिसतोय. रुपालीचा जुना फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. जुन्या फोटोत रुपालीला ओळखणंही कठीण असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.


या फोटोसोबत कॅप्शन देताना रुपालीने म्हटलंय, ‘‘अरे देवा, ही मुलगी खूप दूरपर्यंत आली आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे आभार. माझ्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मी स्वतः होते आणि स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वांचं आहे. आता घडणाऱया गोष्टी आधीसारख्या नसल्या तरी लढण्याची शक्ती अजूनही तशीच आहे.’’

आपली प्रतिक्रिया द्या