रोमॅण्टिक सीन देताना दिग्दर्शक वाटेल तिथे हात लावायचे, प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

3531

रोमॅण्टिक सीनचे शूट सुरू असताना दिग्दर्शक मला वाटेल तिथे हात लावायचा, असा गौप्यस्फोट करत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील काळीबाजू सर्वांसमोर आणली आहे. छोट्या व मोठ्या पडद्यावर गाजलेली अभिनेत्री समेक्षा सिंह हिने नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे.

sameksha-singh-11

‘एका चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी रोमॅण्टिक सीन शूट करत असताना दिग्दर्शकाने सीन व्यवस्थित असताना देखील तो काही ना काही कारणाने कट केला. सीन कट केल्यानंतर ते मला तो सीन कसा करायचा ते दाखवत होते व त्यावेळी मला वाटेल तिथे हात लावायाचे. मला असं वाटत होतं ते मजा घेण्यासाठी मला हात लावत आहेत’, असे समेक्षाने या मुलाखतीत सांगितले आहे.

समेक्षा ही गेल्या 15 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असून तिने आतापर्यंत हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु, कन्नड, पंजाबी, भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या