Photo – राज कुंद्रा अटक प्रकरणावर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, इंस्टावर झाली व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अश्लील चित्रपट प्रकरणी पती राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिने कुणालाही प्रतिसाद दिला नव्हता. इतकेच काय तर तिने सामाजिक कार्यक्रमांसह आपले शूटिंग शेड्यूल देखील थांबवले. सोशल मीडियावर बऱ्याचदा पोस्ट शेअर करणाऱ्या शिल्पाने इथे देखील शांतता ठेवली होती. मात्र आता ती इंन्स्टाग्रामवर व्यक्त झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

shilpa-raj-kundra2

उद्योगपती राज कुंद्रा याला पोलिसांनी अश्लील फिल्म बनवणे आणि अॅप्सवर प्रसारित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. राज कुंद्राला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

shilpa-raj-kundra1

शिल्पाने एका पुस्तकाची झलक शेअर केली आहे. ज्यामधील James Thurber च्या वाक्यांकडे ती लक्षवेधू इच्छित आहे. तिने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात ती म्हणते, रागाने भूतकाळाकडे आणि भितीने भविष्याकडे पाहू नका, मात्र जागरुक राहून चहूबाजूंवर लक्ष ठेवा.

shilpa-raj-kundra3

पुढे ती म्हणते, ‘आपण रागानं त्या लोकांकडे बघतो ज्यांनी आपल्याला दु:ख दिले, ज्यांच्यामुळे आपण फ्रस्ट्रेटशनमध्ये गेलो, दुर्दैव आपण अनुभवलं.’

shilpa2

‘तर भविष्याची भीती देखील आहे की आपली नोकरी जाऊ शकते, आजार घेरू शकतात, कधी कुणाचा मृत्यू देखील ओढावू शकतो. पण आपल्याला इथंच दक्षता घ्यायची आहे. जे झालं आहे किंवा जे झालं असतं त्याबद्दल उताविळ होऊ नये, पण जागरुक मात्र राहिले पाहिजे.’

shilpa1

‘मी जिवंत आहे असं जाणून एक दीर्घ श्वास घेते. भूतकाळातील आव्हानांना मी तोंड दिलं आहे आणि भविष्यातील आव्हानांपासूनही मी स्वत:चा बचाव करेन. कोणतीही आवश्यकता मला आज माझं जीवन जगण्यापासून रोकू शकत नाही.’

shilpa-shetty-1

23 जुलै म्हणजे आजच शिल्पाचा हंगामा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पूर्नपदार्पण करणार आहे. हा चित्रपट प्रियदर्शनने बनवला आहे.