‘ही’ अभिनेत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदी मालिकांमध्ये काम करत छोटा पडदा गाजवणारी एक अभिनेत्री आज संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या वावड्या गेल्या काही दिवसांपासून उडत होत्या. या वावड्या खऱ्या ठरल्या असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत या अभिनेत्रीचा प्रवेश होणार आहे.

शिल्पा शिंदे हिने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेद्वारे लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ती बिग बॉसच्या 11व्या सीझनची विजेती देखील आहे. या शोनंतर ती छोट्या पडद्यावर फारशी दिसली नव्हती. काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांमुळे शिल्पा शिंदे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.