
अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्याही पुढे मजल मारली आहे. गेल्या दोन दिवसांत देशाच्या शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्सचा भाव मोठय़ा प्रमाणात घसरला. त्यामुळे अंबानींच्या कमाईत घसरण झाली आणि गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
‘फोर्ब्स’च्या रियल-टाइम नेटवर्क डेटानुसार गौतम अदानी यांची संपत्ती 6.72 लाख कोटी रुपये झाली आहे तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. संपत्तीच्या बाबतीत अदानी हे जगामध्ये 11 व्या क्रमांकावर आहेत.




























































