अदानी समूहाच्या ऑडिटर कंपनीचा राजीनामा

 अदानी उद्योग समूहाच्या व्यवहाराचे ऑडिट करणाऱया डेलॉयट हॅस्किन्स ऍण्ड सेल्स एलएलपी कंपनीने आपल्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला आहे. 2017 पासून ही कंपनी अदानी समूहाचे ऑडिटरचे काम सांभाळत होती. अदानी समूहाने जुलै 2022 ला या कंपनीला पाच वर्षांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कंपनीने ऑडिटर पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या कंपनीच्या राजीनाम्यानंतर आता एमएसकेए ऍण्ड असोसिएट्स ही कंपनी ऑडिटरचे कामकाज पाहणार आहे.