अदिती राव हैदरी ठरली गोल्डन आयकॉन परफॉर्मर!

बॉलिवूडमधील राजघराण्यातील राजकुमारी अदिती राव हैदरी ही तिच्या अष्टपैलु अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसते. अदितीने नुकतेच गलाट्टा अवॉर्ड्स 2023 मध्ये गोल्डन आयकॉन परफॉर्मर पुरस्कार पटकावला.

यावेळी अदितीने रेशमी ब्लाउस सह केशरी रंगाची ऑरगॅन्झा साडी परिधान केली होती. कानामध्ये झुमके घालून मिनीमल लूक करण्यात आला होता. या पोशाखात आकर्षक दिसत होती.

अदिती राव हैदरीने पद्मावतसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयने प्रेक्षकांवर उल्लेखनीय छाप पाडली आहे. आता लवकरचं संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडीमध्ये झळकणार आहे.