पृथ्वीपासून 50 हजार किमीवर पोहोचलं ‘आदित्य’ यान, इस्रोने दिली माहिती

सुर्याच्या अभ्यासासाठी इस्रोने सोडलेल्या आदित्य एल 1 या यानाविषयी नवीन माहिती मिळत आहे. आदित्य यान हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 हजार किमी दूर पोहोचलं असून त्याने आपलं काम सुरू केलं आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

आदित्यने स्टेप्स या उपकरणाने सुप्राथर्मल आणि एनर्जेटिक आयन्स तसं इलेक्ट्रॉन्सच मापन सुरू केलं आहे. या माहितीमुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या आसपास असलेल्या सौरकणांच्या हालचालींचं विश्लेषण आदित्य करणार आहे. हे यान सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान लाँग्रेज बिंदूच्या सभोवती प्रभामंडळातील कक्षेत भ्रमण करणार आहे. या भ्रमणातून सहा दिशांना असलेल्या सेन्सरने अनेक प्रकारची माहिती आदित्य हे यान जमा करणार आहे.