आदित्य ठाकरे यांनी नितीशकुमार यांची घेतली भेट, या विषयांवर झाली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची आज पाटणा, बिहार येथे भेट झाली. यानंतर या भेटी संदर्भा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारजी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीशजी वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली. स्व. बाळासाहेब व उद्धवसाहेबांशी नितीशजींचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.’