Photo – आदित्य ठाकरे यांनी कोळीबांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे कोळीवाड्यात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीत आदित्य ठाकरे सहभागी झाले. यावेळी कोळीबांधवांनी आदित्य ठाकरे यांना पारंपरिक कोळी टोपी घातली आणि स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनी मिरवणुकीदरम्यान कोळीबांधवांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अतिशय उत्साहाचे आणि आनंदायी असे वातावरण होते. वरळी समुद्र किनाऱ्यावर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नारळी पौर्णिमेचे पूजनही करण्यात आले.

फोटो : रुपेश जाधव