आदित्य ठाकरे यांचा आज धारावी आणि नायगावमध्ये शाखासंवाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावाती शाखासंवाद दौरा सुरू आहे. आदित्य ठाकरे उद्या, दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता लेबर कॅंम्प, धारावी येथे तर रात्री 8 वाजता शिवसेना वडाळा विधानसभा मध्यवर्ती कार्यालय, नायगाव क्रॉस रोड येथे भेट देऊन ते शिवसैनिकांसह स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना नेते अनिल देसाई या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.