अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, असगरची कर्णधारपदावरून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । काबुल

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धा ऐन तोंडावर आली असताना असगर अफगाणची संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. मात्र, संघातील अनेक सहकाऱयांनी बोर्डाच्या या तडकाफडकी निर्णयावर नाराजी व्यक्त केली. अष्टपैलू मोहम्मद राशिद व फिरकीपटू मोहम्मद नबी यांनी तर थेट राष्ट्रपतींनाच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने असगर अफगाणकडून क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील कर्णधारपद काढून घेतले. एकदिवसीयसाठी गुलबदीन नाईब, कसोटीसाठी रहमत शाह व टी-20साठी राशिद खान यांच्याकडे अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. मात्र स्वतः राशिद खानने असगरला कर्णधारपदावरून हटविण्यास विरोध केला आहे. ‘आयपीएल’मध्ये खेळत असलेल्या राशिद आणि नबी यांनी बोर्डाकडे या निर्णयाबद्दल नाराजी कळविली आहे.