अफगाणींच्या सुरक्षेसाठी सोशल मीडियाची सतर्कता, ट्विटर लवकरच जुने ट्विट्स हटवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबान्यांच्या दहशतीखाली असलेल्या अफगाणींच्या सुरक्षेसाठी सोशल मीडिया कंपन्याही ‘ऍलर्ट’ मोडवर आहेत. तालिबान्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून अफगाणी नागरिकांचे रक्षण करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने मोठी पावले उचलली आहेत. त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये फेसबुक युजर्सना दुसऱयाच्या फ्रेंडलिस्टमध्ये डोकावता येणार नाही. तसेच ट्विटर लवकरच जुने ट्विटस हटवणार आहे.

तालिबानचे दहशतवादी सोशल साईट्सच्या मदतीने अफगाणी नागरिकांचे सोशल कनेक्शन तसेच डिजिटल हिस्ट्री ट्रक करू शकतील. याच अनुषंगाने सोशल मीडिया कंपन्यांनी विशेष खबरदारी बाळगली आहे. फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘वन क्लिक टूल’ लॉन्च केला आहे. युजर्सनी या टूलचा वापर केल्यास त्यांच्या अकाऊंटमध्ये कुणीही घुसखोरी करू शकणार नाही. त्यांच्या टाईमलाईनवरील पोस्ट फ्रेंडलिस्टमध्ये नसलेल्या इतर युजर्सना पाहता येणार नाही किंवा त्यांचा प्रोफाईल फोटो कुणी शेअर करू शकणार नाही. फेसबुकवर दुसऱयाची फ्रेंडलिस्ट पाहणे आणि सर्च करणे हे पर्याय अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत. अफगाणींची तालिबान्यांपासून सुरक्षा करण्याचा हा प्रयत्न आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.

  • ट्विटर लवकरच जुने ट्विट्स डिलीट करण्यावर काम करीत आहे. जर अफगाणी नागरिक त्यांची महत्त्वपूर्ण माहिती असलेली अकाऊंट्स उघडू शकले नाहीत, तर कंपनी ते अकाऊंट्स अनिश्चित काळासाठी बंद करणार आहे. युजर्स जोपर्यंत आपली महत्त्वाची माहिती हटवत नाही तोपर्यंत संबंधित अकाऊंट्स बंद केली जातील, असे ट्विटरने जाहीर केले आहे. ‘लिंक्डईन’नेही आपल्या युजर्सचे कनेक्शन गोपनीय ठेवले आहेत.