‘बालाकोट’नंतर 513 वेळा पाकडय़ांनी केले सीमेवर हल्ले; धुमश्चक्री सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

हिंदुस्थानी हवाई दलाने ‘बालाकोट’ येथे केलेल्या जबरदस्त हवाई स्ट्राइकनंतर पाकडे बिथरले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून 26 फेब्रुवारीपासून गेल्या दीड महिन्यात तब्बल 513 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. पाकडय़ांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. सीमेवर रोजच धुमश्चक्री सुरू आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदने भयंकर आत्मघाती दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला. त्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या हल्ल्यानंतर पाकडे बिथरले. सीमेवर रोजच हल्ले सुरू आहेत.

रोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन

 26 फेब्रुवारीपासून आतापर्यंत गेल्या दीड महिन्यात तब्बल 513 वेळा पाकिस्तानी सैन्याकडून 513 वेळा शस्त्र्ासंधीचे उल्लंघन केले गेले. त्यात 100 वेळा मोर्टर्स आणि तोफांचा वापर करण्यात आला, अशी माहिती हिंदुस्थानी लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी राजौरी येथे पत्रकारांना सांगितले. n पाकडय़ांच्या गोळीबारात चार जवान शहीद झाले आणि सीमेलगतच्या गावातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पूंछ सेक्टरमध्ये दोन मुलींसह चार नागरिक जखमी झाले.

पाकिस्तानची सहापट जास्त जीवितहानी

हिंदुस्थानी जवानांच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानी सैन्याची पाच ते सहापट जास्त जीवितहानी झाली आहे, पण पाक सैन्याकडून ही माहिती लपवून ठेवली जात आहे, असे  लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी सांगितले.