
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आता जरी हा विषाणू पूर्वीइतका धोकादायक मानला जात नसला, तरीही कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये उद्भवणारे आजार हे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. लोकांच्या आरोग्यावर कोरोनाचा दीर्घकालीन परिणाम काय आहे, याबद्दल खात्रीपूर्वक काहीही सांगणे कठीण आहे. पण गेल्या तीन वर्षांत या साथीने लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे.
संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होतो. या महामारीमुळे अनेक रोगांचे निदान आणि उपचारांमध्येही अडथळे आले. लोकांना बैठ्या जीवनशैलीची सवय होणे, हा एक दुष्परिणाम कोविड 19 या साथीच्या रोगामुळे सुरू झाला. बरेच लोक अजूनही या त्रासाचा सामना करत आहेत शिवाय काही जणांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनानंतर
मानसिक आजार
कोरोनानंतर चिंता, नैराश्य, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेशी संबंधित समस्या काही व्यक्तिंमध्ये निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीवर याचा परिणाम होऊ लागला. ताणतणाव, एकटेपणा, कोरोनामध्ये जवळचे लोक गमावणे आणि आर्थिक संकट यामुळे आजारांत वाढ होऊ लागली, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
कर्करोग
कर्करोगानंतर अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू लागला. याविषयी केलेल्या संशोधनाबाबत तज्ज्ञांनी म्हटले की, कोविड-19 विषाणू p53 (ट्यूमर बनवण्यास प्रतिबंध करणारा जनुक) यामुळे कर्करोगाची वाढ रोखण्याची क्षमता कमकुवत होते.
श्वासाशी संबंधित आजार
सतत खोकला, धाप लागणे, दीर्घकाळ छाती जड होणे या समस्यांचे कारणही कोरोना आहे. अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यासारखे श्वसनाशी संबंधित आजारही कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये दिसू लागले आहेत. त्यामुळे Covid-19 चा प्रामुख्याने श्वसन प्रणालीवर परिणाम झाला असून यामुळे दीर्घकाळ खोकला, श्वास लागणे आणि थकवा यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. याशिवाय, घरातील वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
रक्तदाब
लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या महामारीनंतर निर्माण होऊ लागली आहे. जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोविड महामारीनंतर सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा आजार वेगाने वाढला आहे. हे चिंताजनक आहे.
ह्रदय रोग
कोरोनंतर ह्रदयविकार, ह्रदयाचे अनियमित ठोके, रक्त गोठणे यासारख्या ह्रदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मधुमेह
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह होण्याबरोबरच इतरही आजारांना सामोरे जावे लागू शकते.
दमा
शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होणे कोरोना काळात आव्हानात्मक होते. विषाणुंचा सामना करावा लागल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती बिघडते. यामुळे खोकला, छातीत दुखणे, घसा खवखवणे, दमा यासारख्या त्रास वाढ होत आहे.
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)
सामान्य लोकांपेक्षा कोरोना 19 मुळे COPD ग्रस्त लोकांना श्वासोच्छवास आणि फुफ्फुसाचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. COPD मध्ये न्यूमोनिया होण्याचा धोकाही वाढतो. यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
जुनाट आजार कसे टाळायचे
अनेक जुनाट आजार हे आपल्या जीवनशैलीशी आणि खाण्या-पिण्याच्या सवयींशीही संबंधित असतात. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करून, जुनाट आजार होण्याची शक्यता कमी करता येऊ शकते. यामुळे निरोगी जीवन जगता येऊ शकते.

























































