गतवर्षीच्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सुमारे वीस जिह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. सरकारने मदतीचे आश्वासन दिले, पण निधीची चणचण असल्यामुळे मदत होत नव्हती. आता राज्य सरकारने अखेर मदतीचा हात पुढे केला असून नियमात बदल करून अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली. पण मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत दिलेली नव्हती.