
आमिर खानचा सितारे जमीन पर या हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. हे बदल केल्यानंतरच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजूरी दिली आहे. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान असायला हवं असा बदल सेन्सॉर बोर्डाने सांगितला होता. हा बदल केल्यानंतर सितारे जमीन पर चित्रपट प्रदर्शनासाठी मोकळा झाला आहे.
16 जून रोजी सेन्सॉर बोर्डाने सितारे जमीन पर चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी चार बदल सुचवले होते. त्यापैकी मायकल जॅक्सन ऐवजी लव बर्ड्स हा शब्द वापरायला सांगितला होता. दुसरा बदल होता की बिजनेस वुमन ऐवजी बिजनेस पर्सन शब्द करण्यास सांगितले होते. तिसरा बदल म्हणजे जिथे कमळ फुलाचा एक शॉट होता तो हटवायला सांगितला गेला. तर चौथा बदल म्हणजे चित्रपटाच्या मूळ डिसक्लेमर ऐवजी पंतप्रान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं विधान टाकायला सांगितला. निर्मात्यांनी हे बदल केले आणि त्यानंतरच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजूरी दिली. आता 20 जून रोजी सितारे जमीन पर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.