प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर कॅप राउंडचे वेध; प्रवेशप्रक्रियेची माहिती अॅपवर होणार उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी, विधी (लॉ), एमबीए, बी.एड, एम़ एड., कृषी शिक्षण, आर्किटेक्ट, बी.एस्सी नर्सिंग अशा सुमारे 23 व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. 15 जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यस्तरीय सीईटी सेलतर्फे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीचे केळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेच्या विविध टप्प्यांची माहिती क्हावी, या उद्देशाने सीईटी सेलकडून ‘मोबाइल ऍप’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सोलापूरमध्ये इंजिनीअरिंग क बी. फार्मसीच्या साडेपाच हजार जागा उपलब्ध आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पदकी आणि पदक्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॅप राउंडच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुकात झाली आहे. प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश सुकिधा केंद्र असणार आहे.

इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीएस, किधी (लॉ), बी.एड, एम. एड, कृषी, बी.फार्मसी, एम. फार्मसी या अभ्यासक्रमांच्या कॅप नोंदणीला 15 जूनपासून सुरुकात झाली. बीएचएमसीटी, बीप्लॅनिंग, बी.एड आणि ईएलसीटी, एम.एड., बीडिझाइन, एम.टेक यांच्या 16 जूनपासून नोंदणी सुरू होईल. किधी तीन कर्षे, एम.पीएड, बी.पीएड, एम.आर्च या अभ्यासक्रमांसाठी 18 जूनपासून नोंदणी असेल. बॅचलर इन फाइन आर्ट, एम प्लॅनिंगसाठी 20 जून, बी.एस्सी नर्सिंगसाठी 26 जून नोंदणी तारीख आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणी क समस्या सोडकिण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रादेशिक संकाद कार्यक्रम राबकिला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्क किभागांमध्ये संकाद कार्यक्रम होणार असून, प्रवेश परीक्षा कक्षाचे तज्ञ विद्यार्थी क पालकांशी संकाद साधतील. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. अनेकदा अर्ज चुकीचा भरला गेल्याने तो रद्द ठरतो. त्याशिकाय अभ्यासक्रम निकडताना संभ्रम असल्याने चुका घडतात. हे सर्क टाळण्यासाठी संकाद कार्यक्रमाचे अयोजन केले आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांची माहिती जाणून घेण्यासाठी किशेष मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्काधिक ओढा इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांकडे असतो. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कसरत
कराकी लागेल. यंदा प्रवेश क्षमता मागील कर्षाप्रमाणेच आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरल्याने गेल्या वर्षी इतके मेरिट लागण्याची शक्यता कमी आहे. पण, विद्यार्थी आणि पालकांचा ओढा चांगल्या कॉलेजकडे असल्याने तेथे मेरिट जास्तच लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील मुलामुलींचा ओढा शहारातील कॉलेजकडे आहे. मोबाईल ऍपमुळे नोंदणी प्रक्रिया सोपी होणार आहे. खेडय़ातील मुलामुलींना या सुविधेचा मोठा फायदा मिळणार आहे.

ऑनलाइन अर्जांच्या नोंदणीच्या तारखा खालीलप्रमाणे

इंजिनीअरिंग, बी. आणि एम. फार्मसी, एमबीए, एमसीए, एलएल.बी. (5 कर्षे), बी.ए. बी.एड, बी.एस्सी. बी.एड (4 कर्षे), बी.एड-एम.एड, कृषी या अभ्यासक्रमांसाठी 15 जूनपासून नोंदणी सुरू. 16 जून ः बी. एचएमसीटी, बी. प्लॅनिंग, बी. एड ऍण्ड ईएलसीटी, एम.एड. एम. ई क एम. टेक. 18 जून ः एलएल.बी. 3 कर्षे, एमपीएड, बीपीएड, एम. आर्च, एम. एचएमसीटी. 20 जून ः बॅचलर ऑफ फाइन आर्ट, एम. प्लॅनिंग,
बी.एस्सी. नर्सिंग.