अगडबम नाजुकाचे म्युझिक लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऑस्करविजेते  संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘माझा अगडबम’ या चित्रपटाचा म्युझिक  लाँच सोहळा नुकताच ताज लॅन्डस् अँड हॉटेलमध्ये पार पडला. महाराष्ट्राची लाडकी नाजुका आणि रेहमान यांची झालेली ग्रेटभेटदेखील रंजक ठरली. तृप्ती भोईर लिखित आणि दिग्दर्शित ‘माझा अगडबम’ याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. सिनेमाचे संगीत दिग्दर्शक तसेच निर्माते टी. सतीश चक्रकर्ती यांना शुभेच्छा देण्यासाठी रेहमान या सोहळ्याला विशेष उपस्थित राहिले. चित्रपटातील ‘हळुवारा हलके’ हे गाणे यावेळी लाँच झाले.  गायिका श्रेया घोषालच्या आवाजातील गाणं प्रेक्षकांना भावुक करून जाते. चित्रपटाती नाजुका या प्रमुख क्यक्तिरेखेवर हे गाणं चित्रित आहे.