स्त्री-पुरुषांसाठी लग्नाचे कायदेशीर वय समान ठेवण्याची मानवी हक्क आयोगाची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्त्री आणि पुरुष या दोघांचेही लग्नाचे वय सारखे असले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) घेतली आहे.

एनएचआरसीतफें बालविवाहावर येथे एक राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. तेव्हा एनएचआरसीच्या सदस्या ज्योतिका कार्ला म्हणाल्या, मुलगा-मुलगी यांच्या लग्नासाठी एकच कायदेशीर वय ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालय आणि देशाच्या विधी आयोगानेसुद्धा लग्नासाठी दोघांचे एकच वय ठेवण्यास अनुकूलता दाखविली आहे, असेही कार्ला यांनी सांगितले. लग्नाचे कायदेशीर वय तरुणांसाठी 21 आणि तरुणींसाठी 18 असे नको. दोघांच्या वयातील या फरकाला आधार देणारी कोणतीही शास्त्रीय माहिती नाही. ही विसंगती मुले आणि त्यांच्या लग्नावर परिणाम करीत आहे, असे कालरा यांनी स्पष्ट केले. तसेच लग्नाची नोंदणी बंधनकारक करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.