Video – अर्णब गोस्वामीच्या अटकेची मागणी; चंद्रपूरात काँग्रेसचे धरणे आंदोलन

टीआरपी घोटाळाप्रकरणी आरोपी असलेल्या संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

 


पाकिस्तानवरील एअर स्ट्राओईकबाबतचा उल्लेख तीन दिवस आधीच केल्याचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमध्ये आढळून आले. देशाच्या संदर्भातील गोपनीय माहितीचा प्रसार त्यांनी केला. हे कृत्य अतिशय देशविघातक असल्याने गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या