सीएएच्या विरोधात लंडनमध्ये निदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत असताना याचे पडसाद देशाच्या बाहेरही उमटाताना दिसून येत आहेत. लंडनमध्येही या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. निदर्शनात विविध क्षेत्रातील लोक आणि विद्यार्थांचा सहभाग होता.

ऑक्सफर्ड विद्यापीठातही हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात निदर्शने केली. लंडनस्थित हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज एसओएएस मधील हिंदुस्थानी नागरिकांनी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्ससह अन्य काही संस्थांनीही या निदर्शनांना पाठिंबा दर्शवला आहे.