मावळ तालुका शिवसेनेतर्फे चीनच्या राष्ट्रपतींचा पुतळा जाळून निषेध

हिंदुस्थानच्या सीमेवर चिनी सैनिकानी घुसकोरी करून आपल्या हिंदुस्थानी जवानांवर हल्ला केला. त्यात हिंदुस्थानचे 20 जवान शहिद झाले. तसेच काही जवान जखमी झाले. सीमाभागात देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना मावळ तालुका शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मावळमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.

चीनविरोधी घोषणा देत यापुढे चीनची कुठलीही वस्तू कोणीही खरेदी करू नये, असे आवाहन जनतेला करण्यात आले. यावेळी मावळ तालुका युवासेना विस्तारक राजेश पळसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, महिला आघाडी प्रमुख व जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे, तळेगाव शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, शिववाहतूक सेना जिल्हाप्रमुख पंकज खोले यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या