
प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पर्ससीन मासेमारीवविरोधात उपोषण आणि धरणे आंदोलने करण्यात आले. बंदीकाळात सुरु असलेली पर्ससीन मासेमारी बंद करा, एलईडी दिवे वापरून सुरू असलेल्या मासेमारीवर कारवाई करा,जिल्हा परिषद आदर्श येगाव शाळा क्रमांक1 च्या दुरूस्तीत घोटाळा झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलन केले.
सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पारंपारिक मच्छिमार समन्वय समितीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. बंदी असतानाही पर्ससीन मासेमारी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर एलईडी दिवे लावून मासेमारी सुरु आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.चिपळूण तालुक्यातील येगाव जिल्हापरिषद शाळा क्रमांक1 च्या दुरुस्ती कामात चिपळूण पंचायत समिती बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी घोटाळा केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उपोषण केले. रिक्षाचालकांच्या समस्या आणि मागण्यांसाठी रत्नदुर्ग रिक्षा संघटनेनेही धरणे आंदोलन केले.



























































